पुढील 4 ते 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाडा ,मध्यप्रदेश, छत्तीसगड यासह अनेक राज्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (अंदाजे 30 ते 50 प्रतितास वेगाने) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ही आहे की, मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून वारे वेळेपूर्वीच अंदमान व निकोबार तसेच केरळ मध्ये दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून १९ मे पर्यंत अंदमान व निकोबार बेटावर दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व कामे लवकर करून घ्यावीत.मागील वर्षी कमी झाल्यामुळे यंदा वेळेवर येणार मान्सून शेतकऱ्यांसाठी आनंदाची व दिलासादायक ठरणार आहे.
मान्सूनची वाटचाल-
दक्षिण बंगालच्या उपसागरात दक्षिण या अंदमान व निकोबार बेटातील समुद्रात मान्सूनची हालचाल दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी मान्सून २२ मे पर्यंत दाखल होतो. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे
मान्सूनच्या वाटचालीवर केरळ मधील आगमन ठरणार-
नैऋत्य मोसमी वारे देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरात दस्तक देणार आहे. यामुळे १ जून रोजी सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळला मान्सून येणार आहे. बंगालच्या उपसागरात व हिंदी महासागरात मान्सूनची वाटचाल कशी राहिल, यावर १ जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे.
अवकाळी पाऊस 19 मे पर्यन्त राहणार-
अवकाळी पाऊस १९ मे 2024 पर्यंत कायम राहणार आहे. १९ मे नंतर अवकाळी पावसाचे वातावरण कमी होणार आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या एप्रिल महिन्याच्या अंदाजा नुसार पाऊस 106% राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा मे महिन्याचा शेवटी सुधारित अंदाज व्यक्त करणार आहे
मध्य महाराष्ट्रात,विदर्भ व मराठवाड्यात पाऊस होणार-
गुजरात,दमन दीव ,बिहारसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, आयएमडीने ताज्या अलर्टमध्ये म्हटले आहे की सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ सक्रीय आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (30-50 किमी प्रतितास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे