लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड, महायुती सरकारकडून 5500 रुपयांचा बोनस

महायुती सरकारने राज्यामध्ये जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये दरमहा १५०० रूपये महिलांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेची राज्यभर सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या योजनेचे आगामी विधानसभा निवडणुकीआधी जोरदार कॅम्पेन केल्याचं पाहायला मिळालं. अशातच मोठी बातमी समोर आली असून लाडक्या बहिणींची दिवाळी आणखी गोड होणार आहे. लाडक्या बहिणींना ५५०० रूपयांचा बोनस मिळणार असल्याचं समजत आहे.

महायुती सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्ये पात्र मुलींना आणि महिलांना अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दिवाळी असून त्याआधी सरकारकडून सर्व लाभार्थी तरूणी आणि महिलांना ३००० रूपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम महिन्याला मिळणाऱ्या १५०० रूपयांपेक्षा वेगळी दिली जाणार आहे. त्यासोबतच काही महिलांना २५०० रूपये अतिरिक्त दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे . यामध्ये लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपये त्यांच्या खात्यावर जमा होतात. या योजनेला पात्र होण्यसाठी काही अटी आहेत तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ६० अशी वयोमर्यादा आहे. आता नवीन बदलानुसार हो वयोमर्यादा ६५ पर्यंत करण्यात आलीये. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत. मात्र अर्जदार महिला महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हव्यात.

दरम्यान, या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी आधार कार्ड, अधिवास दाखला /जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो हा कागदपत्रे लागतात. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४६००० करोड रूपयांचा ताण वाढला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याच्या तारखेमध्ये तीनवेळा वाढ केली आहे. सुरूवातीला १ जुलै ते १५ जुलै २०२४ अशी होती, नंतर ३१ ऑगस्ट केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरायला उशिर झाल्याची तक्रार महिलांनी केली होती. सरकारने ३० सप्टेंबर तारीख केलेली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवली असून १५ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *